
मकरंद गडावरची थरारक चढाई ऐन वेळी बदललेला बेत एक थरारक अनुभव पदरात टाकून जाईल याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती. मकरंद गडाचा अखेरचा थरारक टप्पा ऐन पावसात एकांतातल्या रांगड्या मकरंद गडानं अनपेक्षितपणे एक धम्माल अनुभव दिला. किल्ला सर करण्यापूर्वी आधुनिक प्रथेप्रमाणं प्रथम नेटवर चंद्रगडाचे फोटो पाहिले. त्याचं कातिल रुपडं पाहून आम्ही खुळावलो होतो. चंद्रगडाचा परिसर असा असेल तर खुद्द गड कसा असेल? केवळ या कल्पनेनेच कधी एकदा त्या गडावर स्वारी करतो, अशी आमची स्थिती झाली होती. महाबळेश्वरहून चंद्रगडला जाता येत असल्याची माहिती आमच्या एका भटक्या मित्रानं दिली होती. त्यासाठी एका पूर्ण दिवसाची तंगडतोड करावी लागत असल्याचंही तो बोलल्याचं लक्षात होतं. दिवसभर तंगडतोड करण्याऐवजी सरळ 'खुष्की'च्या मार्गानं जावं असं ठरलं. गडावर जाण्यासाठी वाई-जोर-ढवळ्या घाट-ढवळ्या गाव-चंद्रगड असा दुसरा मार्ग आम्ही शोधून काढला आणि त्याच रस्त्यानं जावं, हा निर्णय पक्का झाला. ठरल्या वेळी आम्ही जमलो आणि सातारा रस्त्यानं मार्गी लागलो. गाडी धावत असतानाच चंद्रगडाबाबत चर्चा सुरू झाली. ढवळ्या घाटातून गा...