माळरानातील किलबिलाट सायबेरियन स्टोनचॅट (सायबेरियन गप्पीदास) भटक्यांच्या आयुष्यात कधी कधी अनाहूतपणे बैठं जीवन येतंच. अनपेक्षितपणे पडलेला कामाचा अतिरिक्त भार किंवा आजारपण अशी कारणं त्यामागं असू शकतात. सलग पंधरा-वीस दिवस डांबून घेतल्यासारखं खुर्चीला खिळून राहण्यासारखी दुसरी शिक्षा नसावी. किमान भटक्यांच्या दृष्टीनं. तसं नोकरीचं जोखड मी भिरकटून टाकलं होतं. याचा अर्थ माझा बाणेदारपणा नव्हता, तर मी नियमानुसार निवृत्त झालो होतो. आता मी ज्येष्ठ नागरिक या "कॅटॅगरी'त असलो, तरी माझ्या भटक्या वर्तुळात सगळी तरणीबांड मुलंच होती. उगाच वासरात लंगड्या गाईसारखा मी त्यांच्या कळपात सामील झालो होतो. अर्थात ते मला त्यांच्यापेक्षा वेगळं समजत नव्हते, माझ्या आणि त्यांच्या विचारात नसले, तरी आवडी-निवडीत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी निसर्गवेडा. हातात "छायाचित्रक' म्हणजेच कॅमेरा घेऊन पक्ष्यांच्या, वन्य प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या मागं धावणारा मी कुठं आणि सदासर्वदा पोरींच्या विषयात गुंतलेले हे तरुण मित्र कुठं! माझं वय नजरेआड करून त्यांनी मला आपलं मानलं म्हणूनच मीही त्यांच्या "तसल्या...
Popular posts from this blog
ड्रीमलँड दांडेली
मधू-बाज किंवा मोहोळ घार को णत्याही गोष्टीचा योग यावा लागतो, असं म्हणतात. काही वेळा हे योग अकस्मात, कोणताही हासभास नसताना येतात. सेवानिवृत्तीनंतर हरी हरी म्हणत घरी बसून, मुला-नातवंडांना 'आमच्या काळात असं होतं', 'आम्ही बुवा असं कधीच केलं नव्हतं', असं सांगत त्यांना बोअर करण्याऐवजी आम्ही आमचा छंद जोपासला होता. घरच्यांची आपल्याला आणि आपली घरच्यांना शिंची कटकटच नको, हा आमचा खाक्या! तर सांगायचा मुद्दा असा, की आम्हा पक्षीनिरीक्षक ज्येष्ठ नागरिकांची अनौपचारिक बैठक होते काय आणि अमृतमंथनातून ज्याप्रमाणे स्यमंतक मणी बाहेर पडला तद्वत त्यातून दांडेली बाहेर पडतं काय, सारंच न्यारं! गेल्या फेब्रुवारीतच आम्ही सर्वजण एकत्र रणथंभोरला गेलो होतो. तीन महिने म्हणजे भलताच प्रदीर्घ काळ. दांडेलीचा निर्णय पक्का होताच आम्ही उत्साहानं तयारीला लागलो. ऐनवेळी एक मोती गळाला. खरं तर आम्ही चौघं जाणार होतो. आता इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही येणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही तिघांनीच जायचं ठरवलं. पारंपरिक म्हण थोडीशी बदलून आम्ही "थ्री इज अ कंपनी, फोर इज अ क्राऊड', असं म्हणून तयारीला लागलो. सोमवारी...
Comments
Post a Comment