Posts

Image
निसर्गरम्य राजगड परिसर इंडियन रोलर (नीलपंख) राजगड परिसरातील ओढ्याच्या पुलावर आम्ही चौघंजण डोळ्यांना कॅमेरे लावून डोळे ताणून पाहात होतो. येणारे जाणारे कुतूहलानं पाहात होते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांतूनही लोक एकदा आमच्याकडे पाहात आणि नंतर आमच्या कॅमेऱ्यांचा रोख असलेल्या जागी पाहात आणि निघून जात. त्यांना काही दिसणं शक्यच नव्हतं. काय वेडी माणसं आहेत, असा चेहरा करत ते आपल्या उद्दिष्टमार्गाकडे डोळे लावून पुढं निघून जात. आम्ही मात्र एका लाँग टेल्ड श्राईकची (लांब शेपटीचा खाटीक) धांदल पाहण्यात गुंग झालो होतो. या खाटकानं चोचीत छोटा सरडासदृश काही पकडलं होतं आणि ओढ्याकाठच्या उंबराच्या झाडावर पानांच्या भाऊगर्दीत दिसेनासा झाला होता. तो काही काळ तरी बाहेर येईल, याची आम्ही वाट पाहात होतो. मात्र त्या पठ्ठ्यानं चोचीतल्या भक्ष्यासह काही आम्हाला दर्शन दिलंच नाही. भाविकांना जसं कुंभ मेळ्याचं आकर्षण, तसंच आम्हा काही मंडळींना हिवाळ्याचं आकर्षण. या दिवसांत अतिथंड प्रदेशातील असंख्य लहान-मोठ्या पक्ष्यांची मांदियाळी कुंभ मेळा साजरा करण्यासाठी या महाराष्ट्रभूमीत आपल्या चिमण्या पायांची पायधूळ झाडण्यासाठी...
Image
माळरानातील किलबिलाट सायबेरियन स्टोनचॅट (सायबेरियन गप्पीदास) भटक्यांच्या आयुष्यात कधी कधी अनाहूतपणे बैठं जीवन येतंच. अनपेक्षितपणे पडलेला कामाचा अतिरिक्त भार किंवा आजारपण अशी कारणं त्यामागं असू शकतात. सलग पंधरा-वीस दिवस डांबून घेतल्यासारखं खुर्चीला खिळून राहण्यासारखी दुसरी शिक्षा नसावी. किमान भटक्यांच्या दृष्टीनं. तसं नोकरीचं जोखड मी भिरकटून टाकलं होतं. याचा अर्थ माझा बाणेदारपणा नव्हता, तर मी नियमानुसार निवृत्त झालो होतो. आता मी ज्येष्ठ नागरिक या "कॅटॅगरी'त असलो, तरी माझ्या भटक्या वर्तुळात सगळी तरणीबांड मुलंच होती. उगाच वासरात लंगड्या गाईसारखा मी त्यांच्या कळपात सामील झालो होतो. अर्थात ते मला त्यांच्यापेक्षा वेगळं समजत नव्हते, माझ्या आणि त्यांच्या विचारात नसले, तरी आवडी-निवडीत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी निसर्गवेडा. हातात "छायाचित्रक' म्हणजेच कॅमेरा घेऊन पक्ष्यांच्या, वन्य प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या मागं धावणारा मी कुठं आणि सदासर्वदा पोरींच्या विषयात गुंतलेले हे तरुण मित्र कुठं! माझं वय नजरेआड करून त्यांनी मला आपलं मानलं म्हणूनच मीही त्यांच्या "तसल्या...
Image
काटवनांतले पक्षी - मयुरेश्वर अभयारण्य शॉर्ट टोड ईगल महाराष्ट्रात माळरानं आणि काटवनांची संख्या खूपच कमी होऊ लागली आहे. काही माळरानं अगदीच ओसाड असल्यामुळंच वाचली असावीत. काटवनं मात्र लक्षणीयरित्या कमी झाली आहेत. पुण्याजवळचं मयुरेश्वर हे असंच एक काटवन आहे. मात्र, ते देखिल आकुंचन पावू लागलं आहे. या काटवनाची निर्मिती प्रामुख्यानं चिंकारा जातीच्या हरणांसाठी राखून ठेवण्यात आली असली, तरी तिथं तरस, कोल्हा आणि लांडगेही दिसतात. आसपासच्या शेतातून मोर आहेत आणि खास काटवनातले पक्षीही आहेत. पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटरवर सुपे गावाजवळ हे काटवन आहे. सोलापूर महामार्गावरील यवतच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर उजवीकडे एक फाटा फुटतो. त्याशिवाय चौफुल्यावरून आणि दिवे घाटातूनही इथं येता येतं. खेड शिवापूरहूनही इथं येता येतं. दिवे घाटातून जेजुरीला यायचं आणि गावातूनच मोरगावच्या दिशेनं वळायचं. सुपे गावाबाहेरील रस्त्यावरच वनखात्याची कमान दिसते. या कमानीतून थोडं आत गेल्यानंतर वन खात्याचं कार्यालय लागतं. तिथं नोंद करून आणि आत फिरण्यासाठी असलेलं शुल्क भरल्यावर मयुरेश्वर अभयारण्यात फिरता येतं. सदर्न ग्रे श्राईक...