Posts

Showing posts from January, 2016
Image
सिंहगडाच्या कुशीत एक दिवस व्हर्डिटर फ्लायकॅचर (नीलांग) व न्यजीव आणि विशेषतः पाखरांमध्ये (त्या अर्थानं घेऊ नका हं) माझं मन अधिक रमतं. आदल्या शनिवारीच झालेल्या राजगड परिसरातील भटकंतीनंतर, राजाची लहर जशी फिरत असे, तशीच माझी फिरली आणि गुरुवारीच सिंहगड परिसर गाठायचं मी ठरवलं. ठरवलं म्हणजे काय, तडीसच नेलं. पहाटे पाच वाजता उठून आणि आवरून मी पाठीवर धनुष्यरूपी कॅमेरा आणि भातारूपी मोनोपॉड अडकवला आणि दुचाकीवरून थेट सिंहगड गाठलं. लांब कुठं जाण्याचा कार्यक्रम नसला, की इथं यावं. हमखास काहीतरी नवं मिळतं असा माझा अनुभव होता. सिंहगड व्हॅली ही पक्षीप्रेमींची पंढरीच. सूर्योदयाच्या सुमारास ही व्हॅली जशी पक्ष्यांनी गजबजते, तशीच हौसे-नवसे-गवसे छायाचित्रकारांनीही बजबजते. कधी कधी, विशेषतः रविवारी आणि सुटीच्या दिवशी तर त्याचा इतका अतिरेक होतो, की आपापले कॅमेरे रोखून बसलेल्या छायाचित्रकारांची संख्याच पक्ष्यांपेक्षा कितीतरी जास्त भरते. शिवाय कधी कधी बसण्याच्या जागेवरून वादावादी आणि हमरीतुमरीपर्यंत प्रसंग ओढवतात. काही वेळा वनाधिकाऱ्यांच्या नावाचा हवाला देऊन बसलेल्यांना उठवण्याचीही बळजोरी केली जाते. असो.
Image
निसर्गरम्य राजगड परिसर इंडियन रोलर (नीलपंख) राजगड परिसरातील ओढ्याच्या पुलावर आम्ही चौघंजण डोळ्यांना कॅमेरे लावून डोळे ताणून पाहात होतो. येणारे जाणारे कुतूहलानं पाहात होते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांतूनही लोक एकदा आमच्याकडे पाहात आणि नंतर आमच्या कॅमेऱ्यांचा रोख असलेल्या जागी पाहात आणि निघून जात. त्यांना काही दिसणं शक्यच नव्हतं. काय वेडी माणसं आहेत, असा चेहरा करत ते आपल्या उद्दिष्टमार्गाकडे डोळे लावून पुढं निघून जात. आम्ही मात्र एका लाँग टेल्ड श्राईकची (लांब शेपटीचा खाटीक) धांदल पाहण्यात गुंग झालो होतो. या खाटकानं चोचीत छोटा सरडासदृश काही पकडलं होतं आणि ओढ्याकाठच्या उंबराच्या झाडावर पानांच्या भाऊगर्दीत दिसेनासा झाला होता. तो काही काळ तरी बाहेर येईल, याची आम्ही वाट पाहात होतो. मात्र त्या पठ्ठ्यानं चोचीतल्या भक्ष्यासह काही आम्हाला दर्शन दिलंच नाही. भाविकांना जसं कुंभ मेळ्याचं आकर्षण, तसंच आम्हा काही मंडळींना हिवाळ्याचं आकर्षण. या दिवसांत अतिथंड प्रदेशातील असंख्य लहान-मोठ्या पक्ष्यांची मांदियाळी कुंभ मेळा साजरा करण्यासाठी या महाराष्ट्रभूमीत आपल्या चिमण्या पायांची पायधूळ झाडण्यासाठी
Image
माळरानातील किलबिलाट सायबेरियन स्टोनचॅट (सायबेरियन गप्पीदास) भटक्यांच्या आयुष्यात कधी कधी अनाहूतपणे बैठं जीवन येतंच. अनपेक्षितपणे पडलेला कामाचा अतिरिक्त भार किंवा आजारपण अशी कारणं त्यामागं असू शकतात. सलग पंधरा-वीस दिवस डांबून घेतल्यासारखं खुर्चीला खिळून राहण्यासारखी दुसरी शिक्षा नसावी. किमान भटक्यांच्या दृष्टीनं. तसं नोकरीचं जोखड मी भिरकटून टाकलं होतं. याचा अर्थ माझा बाणेदारपणा नव्हता, तर मी नियमानुसार निवृत्त झालो होतो. आता मी ज्येष्ठ नागरिक या "कॅटॅगरी'त असलो, तरी माझ्या भटक्या वर्तुळात सगळी तरणीबांड मुलंच होती. उगाच वासरात लंगड्या गाईसारखा मी त्यांच्या कळपात सामील झालो होतो. अर्थात ते मला त्यांच्यापेक्षा वेगळं समजत नव्हते, माझ्या आणि त्यांच्या विचारात नसले, तरी आवडी-निवडीत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी निसर्गवेडा. हातात "छायाचित्रक' म्हणजेच कॅमेरा घेऊन पक्ष्यांच्या, वन्य प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या मागं धावणारा मी कुठं आणि सदासर्वदा पोरींच्या विषयात गुंतलेले हे तरुण मित्र कुठं! माझं वय नजरेआड करून त्यांनी मला आपलं मानलं म्हणूनच मीही त्यांच्या "तसल्या'