Posts

Showing posts from February, 2017

आनंदी लोकांचा देश -.भूतान

Image
ब्लॅक नेक्ड क्रेन चा र दिनकी चाँदनी, फिर सुहानी रात...अशा अर्थाची एक म्हण हिंदीत आहे. काही विशेष काम नसल्यानं बरेच दिवस संथ जीवन ढकलत आयुष्य जगणाऱ्या माणसाला एखादा आशेचा किरण दिसल्यानंतर तो जसा आनंदित होतो, असाच आनंद आम्हाला झाला होता. म्हणजे आमची सुहानी रात सुरू होण्याचा चान्स नक्की होता. हल्ली कोणत्याही प्रकारचा आशेचा किरण दिसला, तरी आनंदित होण्याचा आम्ही पायंडा पाडला आहे. आनंद, मग तो फोटोग्राफीचा असो, किंवा प्रवासाचा...या दोन्ही गोष्टी अंतर्बाह्य आनंदित करणाऱ्या आहेत अस आम्ही मानतो. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये प्रथम रणथंभोर आणि नंतर जूनमध्ये उत्तराखंडाचा दौरा केल्यानंतर भूतानला जाण्याचा कल्पना आमच्या कंपूत मांडली गेली. आमचा कंपू आहे साठीपलिकडचा पण 'साठी बुद्धी नाठी' आम्हाला लागू नाही.  ती सर्वांनी भलतीच उचलून धरली, इतकी की आमच्या चारूदत्त देशपांडे नावाच्या मित्रानं सर्वांना फोन करून केवळ कल्पना दिली आणि कोणाची अनुमती न घेता रिझर्व्हेशनची तयारी चालवली. कोणी नकारघंटा वाजवण्यापूर्वी रिझर्व्हेशन करून चक्क मोकळे झाले. आमचे मित्र कुमार जोगळेकर आणि मुंबईचा पु