Posts

Showing posts from 2015
Image
काटवनांतले पक्षी - मयुरेश्वर अभयारण्य शॉर्ट टोड ईगल महाराष्ट्रात माळरानं आणि काटवनांची संख्या खूपच कमी होऊ लागली आहे. काही माळरानं अगदीच ओसाड असल्यामुळंच वाचली असावीत. काटवनं मात्र लक्षणीयरित्या कमी झाली आहेत. पुण्याजवळचं मयुरेश्वर हे असंच एक काटवन आहे. मात्र, ते देखिल आकुंचन पावू लागलं आहे. या काटवनाची निर्मिती प्रामुख्यानं चिंकारा जातीच्या हरणांसाठी राखून ठेवण्यात आली असली, तरी तिथं तरस, कोल्हा आणि लांडगेही दिसतात. आसपासच्या शेतातून मोर आहेत आणि खास काटवनातले पक्षीही आहेत. पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटरवर सुपे गावाजवळ हे काटवन आहे. सोलापूर महामार्गावरील यवतच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर उजवीकडे एक फाटा फुटतो. त्याशिवाय चौफुल्यावरून आणि दिवे घाटातूनही इथं येता येतं. खेड शिवापूरहूनही इथं येता येतं. दिवे घाटातून जेजुरीला यायचं आणि गावातूनच मोरगावच्या दिशेनं वळायचं. सुपे गावाबाहेरील रस्त्यावरच वनखात्याची कमान दिसते. या कमानीतून थोडं आत गेल्यानंतर वन खात्याचं कार्यालय लागतं. तिथं नोंद करून आणि आत फिरण्यासाठी असलेलं शुल्क भरल्यावर मयुरेश्वर अभयारण्यात फिरता येतं. सदर्न ग्रे श्राईक