Posts

Showing posts from 2017

पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण

Image
     ठे विले अनंते तैसेचि राहावे, या संतांच्या शिकवणीचा मराठी माणसांवर भलताच परिणाम झाला असावा. निकड असल्याशिवाय मराठी माणूस शक्यतो प्रवास टाळत असे. किमान विसाव्या शतकात तरी हीच स्थिती होती. त्याला कारणंही बरीच होती म्हणा. पैसा हे महत्त्वाचं कारण. मराठी माणूस फारसा कधी धंद्यात दिसत नव्हता. साहजिकच नोकरी करण्याशिवाय त्याला गत्यंतरच नव्हतं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर एसएससी झाल्यानंतर सरकारी नोकरीत स्वतःला चिटकवून घेतलं, की लग्नाच्या बाजारात तो मिरवायला मोकळा असायचा. पर्यटनाबद्दलची नाराजी ही आर्थिक कारणांमुळंही होती. फुकटचा दवडायला लोकांकडे पैसाच नसायचा. तसा पगारही तुटपुंजाच असे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मात्र परिस्थितीनं अचानकच वळण घेतलं. पगार वाढले, पैसा हातात खुळखुळायला लागला आणि मग सुरू झालं भटकणं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापासून हिमालयातल्या बर्फाळ वाटा तुडवण्यात त्याला मजा वाटू लागली आणि सुरू झाली पर्यटनाची पहाट. पर्यटनाला जाताना प्रत्येकाकडे कॅमेरा असेलच असं नाही. बाजारात हळूहळू चांगले कॅमेरे येऊ लागले होते. कॅनन, निकॉन, ऑलिंपस, फुजीफिल्म, सोनी यांसारख्या कंपन

आनंदी लोकांचा देश -.भूतान

Image
ब्लॅक नेक्ड क्रेन चा र दिनकी चाँदनी, फिर सुहानी रात...अशा अर्थाची एक म्हण हिंदीत आहे. काही विशेष काम नसल्यानं बरेच दिवस संथ जीवन ढकलत आयुष्य जगणाऱ्या माणसाला एखादा आशेचा किरण दिसल्यानंतर तो जसा आनंदित होतो, असाच आनंद आम्हाला झाला होता. म्हणजे आमची सुहानी रात सुरू होण्याचा चान्स नक्की होता. हल्ली कोणत्याही प्रकारचा आशेचा किरण दिसला, तरी आनंदित होण्याचा आम्ही पायंडा पाडला आहे. आनंद, मग तो फोटोग्राफीचा असो, किंवा प्रवासाचा...या दोन्ही गोष्टी अंतर्बाह्य आनंदित करणाऱ्या आहेत अस आम्ही मानतो. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये प्रथम रणथंभोर आणि नंतर जूनमध्ये उत्तराखंडाचा दौरा केल्यानंतर भूतानला जाण्याचा कल्पना आमच्या कंपूत मांडली गेली. आमचा कंपू आहे साठीपलिकडचा पण 'साठी बुद्धी नाठी' आम्हाला लागू नाही.  ती सर्वांनी भलतीच उचलून धरली, इतकी की आमच्या चारूदत्त देशपांडे नावाच्या मित्रानं सर्वांना फोन करून केवळ कल्पना दिली आणि कोणाची अनुमती न घेता रिझर्व्हेशनची तयारी चालवली. कोणी नकारघंटा वाजवण्यापूर्वी रिझर्व्हेशन करून चक्क मोकळे झाले. आमचे मित्र कुमार जोगळेकर आणि मुंबईचा पु

लोकेशन...सिंहगड व्हॅली

Image
व्हर्डिटर फ्लायकॅचर      प हाट झाली, भैरू उठला. कॅमेरा, लेन्स, ट्रायपॉडची जुळणी केली आणि स्वयंचलित दुचाकीवर टांग मारून ४० च्या वेगानं भरधाव निघाला. झुंजूमुंजू होण्यापूर्वी त्याला मोक्याची जागा पकडायची होती. मिळेत ते शॉर्टकट घेत त्याचं वाहनरुपी वारू महामार्ग, कच्चे-पक्के रस्ते, खाच-खळगे पार करत चौखूर धावू लागलं. कितीही घाई केली, तरी भैरूला पोचायला ३५ मिनिटं लागलीच. योग्य ठिकाणी जाऊन मोक्याची जागा पकडण्यासाठी त्याची सारी धडपड व्यर्थ गेली...कारण      ...कारण? सर्वांत आधी पोचण्यासाठी लवकर उठावं लागतं आणि स्नानाला बुट्टी मारून थेट जागा धरण्यासाठी पळावं लागतं, हे केवळ त्यालाच नाही, तर सर्वांनाच माहित असतं. त्याच्याआधीच ५-७ जण पूर्ण तयारीनिशी 'फ्रेमी'त एखादा पक्षी गावण्याची वाट पाहात बसले होते. म्हणजे कल्लाच की हो...! इतक्या पहाटे येण्याची कारणं दोन. पहिलं म्हणजे अर्थातच जागा धरणं आणि दुसरं म्हणजे इतर कुणी येण्याआधीच एखादा वेगळा पक्षी गावलाच, तर सोनेपे सुहागा! वेगळा पक्षी गावणं सोनेपे सुहागा असलं, तरी पहाटेच्या अंधुक उजेडात 'आयएसओ' वाढवूनच फोटू घ्यावा लागतो. नंतर त्याव