पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण
ठेविले अनंते तैसेचि राहावे, या संतांच्या शिकवणीचा मराठी माणसांवर भलताच परिणाम झाला असावा. निकड असल्याशिवाय मराठी माणूस शक्यतो प्रवास टाळत असे. किमान विसाव्या शतकात तरी हीच स्थिती होती. त्याला कारणंही बरीच होती म्हणा. पैसा हे महत्त्वाचं कारण. मराठी माणूस फारसा कधी धंद्यात दिसत नव्हता. साहजिकच नोकरी करण्याशिवाय त्याला गत्यंतरच नव्हतं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर एसएससी झाल्यानंतर सरकारी नोकरीत स्वतःला चिटकवून घेतलं, की लग्नाच्या बाजारात तो मिरवायला मोकळा असायचा. पर्यटनाबद्दलची नाराजी ही आर्थिक कारणांमुळंही होती. फुकटचा दवडायला लोकांकडे पैसाच नसायचा. तसा पगारही तुटपुंजाच असे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मात्र परिस्थितीनं अचानकच वळण घेतलं. पगार वाढले, पैसा हातात खुळखुळायला लागला आणि मग सुरू झालं भटकणं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापासून हिमालयातल्या बर्फाळ वाटा तुडवण्यात त्याला मजा वाटू लागली आणि सुरू झाली पर्यटनाची पहाट.
पर्यटनाला जाताना प्रत्येकाकडे कॅमेरा असेलच असं नाही. बाजारात हळूहळू चांगले कॅमेरे येऊ लागले होते. कॅनन, निकॉन, ऑलिंपस, फुजीफिल्म, सोनी यांसारख्या कंपन्यांचे एकाहून एक सरस पॉईंट अँड शूट कॅमेरे बाजारात येऊ लागले. सुरवातीच्या काळात मात्र काका, पुतण्या, आते-मामे-मावसभाऊ, चुलत बहिणी किंवा अन्य कोणत्या तरी नातेवाईकाकडे हमखास कॅमेरा असायचा. हाच कॅमेरा घेऊन सफरी आयोजित होऊ लागल्या. पॉईंट अँड शूट कॅमेरे आवाक्यात येतात न येतात तोच स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होऊ लागले. उधारीवर कॅमेरा घेण्याची गरजच उरली नाही.
आपण ज्या ठिकाणांना भेटी देतो, तिथली आठवण राहिलीच पाहिजे. पूर्वीचे फिल्मचे कॅमेरे महाग होते. डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खर्चही कमी झाला आणि स्मार्टफोनमुळे फोटो काढणंही सोपं झालं. आता तर डिजिटल कॅमेऱ्यांची मोठी श्रेणी सहजपणे विकत घेता येणं शक्य झालंय. परिणामी छायाचित्रणाकडे वळणाऱ्यांची संख्याही चांगलीच वाढलीय. डिजिटल एसएलआर कॅमेरे आणि त्यांच्या मोठमोठ्या लेन्सेस घेऊन लोक प्रवास करू लागले. स्वतःचं वाहनानं फिरणाऱ्यांना फारशी अडचण येत नाही, पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेणाऱ्यांना मात्र, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या बॅगेबरोबरच कॅमेऱ्याची जास्तीची बॅग घेणं आवश्यक बनलं. अशा दोन्ही बॅगा घेऊन प्रवास करण्यात आता अडचण येऊ लागली. ही अडचण कशी टाळावी, याचाच आता आपण विचार करू.
वाईल्डलाईफ आणि नेचर फोटोग्राफी करणाऱ्यांना आता एकापेक्षा जास्त लेन्सेसची आवश्यकता असते. आपल्याला कशा प्रकारची छायाचित्रं काढावी लागतील याचा अंदाज नसल्यानं, असतील तेवढे कॅमेरे आणि लेन्सेस घेऊन अनेकजण प्रवासाला सुरवात करतात. प्रवासात अनावश्यक ओझं जरूर टाळता येईल. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असू शकते. कोणाला वाईल्डलाईफ, तर कोणाला लँडस्केपमध्ये विशेष रुचि असते. काही जणांना प्राचीन वास्तूकलेमध्ये तर काहींना आधुनिक इमारतींमध्ये रस असतो. आपण ज्या प्रकारचे फोटो काढणार असू, त्याला पूरक असलेले कॅमेरा असला तरी पुरेसं असतं. उदाहरणार्थ मंदिरांसारख्या प्राचीन वास्तूंमध्ये रुचि असलेल्यानं चांगल्या दर्जाचा पॉईंट अँड शूट कॅमेरा नेला तरी चालतं. फक्त फिक्स्ड लेन्स असलेल्या अशा कॅमेऱ्यांची वाईड अँगल तपासून घेतलेलं केव्हाही चांगलं. आपली मंदिरं आकारानं खूप मोठी असू शकतात. ती कॅमेऱ्यात बसवण्यासाठी पुरेसा वाईड अँगल असावाच लागतो. 16 आणि 18 मिमी वाईड अँगल असणारे कॅमेरे आता उपलब्ध आहेत. छोट्या कॅमेऱ्यांमुळे डीएसएलआरचं वजन आपोआप कमी होतं. पॅनासोनिकसारख्या कंपन्यांनी एफ/2.8 किंवा त्याहून कमी फोकल लेंग्थ असलेले कॅमेरे बाजारात आणले आहेत. बहुतेक प्रकारच्या फोटोग्राफीसाठी ही फोकल लेंग्थ खूपच उपयुक्त ठरते.
एखाद्या हौशी छायाचित्रकाराकडे 50 एमएमपासून 600 एमएमपर्यंतच्या लेन्सेस असू शकतात. मोठ्या लेन्सेससाठी ट्रायपॉडही आवश्यक असतो. हे सर्व ओझं नेणं जिकिरीचं ठरतं. डीएसएलआर कॅमेऱ्यानंच फोटो काढायचे असतील तर ज्या प्रकारचे फोटो काढणार असाल, तेवढीच लेन्स सोबत घेतलेली चांगली. उदाहरणार्थ कॅननची 18-135 एमएम ही लेन्स. त्यात वाईड अँगल आणि काही प्रमाणात झूमही मिळतो. मंदिराचा पूर्ण प्राकारही त्यानं घेता येणं शक्य असतं आणि मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण कळसही. ट्रायपॉडचं वजन टाळण्यासाठी कोणत्याही कंपनीची लेन्स खरेदी करताना त्यात इमेज स्टॅबिलायझर असल्याची खात्री करून घ्या. अशा लेन्सना कॅनन इमेज स्टॅबिलायझर तर निकॉन व्हायब्रेशन रिडक्शन म्हणतात. फोटो काढताना हात ट्रायपॉडप्रमाणे अगदी स्थिर राहू शकत नाही. साधी लेन्स वापरली तर असे फोटो ब्लर्ड किंवा हलल्यासाऱखी प्रतिमा मिळते. त्यासाठी इमेज स्टॅबिलायझर मदतीसाठी धावून येतो. अर्थात शटरस्पीड वाढवूनही स्पष्ट प्रतिमा घेता येते. मात्र, हाय शटरस्पीड वापरताना योग्य सेटिंग ठेवणं गरजेचं असतं.
स्थिर चित्रणासाठी हल्ली बाजारात मिळतो तसा खिशात मावणारा ट्रायपॉडही प्रवासात नेता येईल. वजनालाही तो अत्यंत हलका असतो. खरेदी करताना त्याची वजन पेलण्याची क्षमता तपासून पाहिलं, की झालं. शर्ट किंवा पँटच्या खिशात तो सहज मावतो. प्रवासाला जाताना काही लोक लॅपटॉप घेऊन जातात. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. चार किंवा आठ जीबी क्षमतेचं मेमरी कार्ड भरल्यानंतर, दुसरं नसल्यानं नवीन खरेदी करण्यासाठी शोधाशोध सुरू होते. कार्ड खरेदी करतानाच ते अधिक क्षमतेचं, म्हणजे 16 किंवा अधिक जीबीचं असावं. एकापेक्षा अधिक कार्डं असल्यास उत्तम. कारण दुर्दैवानं एखादं कार्ड डिफेक्टिव्ह निघाल्यास, स्वतःलाच दोष देत बसावं लागेल. हल्लीचे कॅमेरे विशिष्ट बॅटरी किंवा नेहमीच्या पेन्सिल सेलवरही चालणारे असतात. सेल घेताना ते रिचार्जेबल असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. शक्य असल्यास बॅटऱ्यांचे दोन सेट असणं अधिक चांगलं. दोन्ही प्रकारच्या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी चार्जर मात्र विसरता कामा नये.
आपण काढलेलं प्रत्येक छायाचित्रं चांगलंच असलं पाहिजे, असा आपला प्रयत्न असतो. एखादं चांगलं निसर्गदृश्य दिसल्यास, सूर्याची दिशा पाहून योग्य जागा पकडणं गरजेचं असतं. अनेकांचा ऑटो मोडवर विश्वास असतो. पण या मोडवरून घेतलेली सर्वच छायाचित्रं चांगली येतात असं नाही. मॅन्युअल किंवा सेमी मॅन्युअल मोड वापरायला प्रत्येकानं शिकलं पाहिजे. बहुतेकजण फोटोचा फॉरमॅट जेपीईजी ठेवतात. काही वेळा अपेक्षेनुसार फोटो आलेला नसल्यास, पोस्ट प्रोसेसिंगमध्ये त्यात सुधारणा करता आली पाहिजे. यासाठी रॉ फॉरमॅटमध्ये फोटो काढणं उपयुक्त ठरतं. कॅमेऱ्यामध्ये तशी सोय असल्यास, हा फॉरमॅट जरूर वापरावा. रॉ एडिटिंगचं त्या कंपनीचं सॉफ्टवेअरही अशा कॅमेऱ्यांसोबत मिळतं. ते शिकणंही महत्त्वाचं आहे.
काही वेळा एखाद्या दृश्याचा फोटो घेतला तरी तो चांगला येईलच अशी स्वतःलाच खात्री वाटत नसते. रॉ फॉरमॅट वापरत असाल, तर बिनदिक्कत असे फोटो काढा. पोस्ट प्रोसेसिंगमध्ये त्यात भरपूर दुरुस्ती करता येऊ शकते. प्रवास करावा, भरपूर करावा आणि भरपूर फोटो काढावेत. शेवटी या साऱ्या आठवणी आपण भविष्यासाठीच साठवून ठेवणार आहोत.

आपण ज्या ठिकाणांना भेटी देतो, तिथली आठवण राहिलीच पाहिजे. पूर्वीचे फिल्मचे कॅमेरे महाग होते. डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खर्चही कमी झाला आणि स्मार्टफोनमुळे फोटो काढणंही सोपं झालं. आता तर डिजिटल कॅमेऱ्यांची मोठी श्रेणी सहजपणे विकत घेता येणं शक्य झालंय. परिणामी छायाचित्रणाकडे वळणाऱ्यांची संख्याही चांगलीच वाढलीय. डिजिटल एसएलआर कॅमेरे आणि त्यांच्या मोठमोठ्या लेन्सेस घेऊन लोक प्रवास करू लागले. स्वतःचं वाहनानं फिरणाऱ्यांना फारशी अडचण येत नाही, पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेणाऱ्यांना मात्र, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या बॅगेबरोबरच कॅमेऱ्याची जास्तीची बॅग घेणं आवश्यक बनलं. अशा दोन्ही बॅगा घेऊन प्रवास करण्यात आता अडचण येऊ लागली. ही अडचण कशी टाळावी, याचाच आता आपण विचार करू.
एखाद्या हौशी छायाचित्रकाराकडे 50 एमएमपासून 600 एमएमपर्यंतच्या लेन्सेस असू शकतात. मोठ्या लेन्सेससाठी ट्रायपॉडही आवश्यक असतो. हे सर्व ओझं नेणं जिकिरीचं ठरतं. डीएसएलआर कॅमेऱ्यानंच फोटो काढायचे असतील तर ज्या प्रकारचे फोटो काढणार असाल, तेवढीच लेन्स सोबत घेतलेली चांगली. उदाहरणार्थ कॅननची 18-135 एमएम ही लेन्स. त्यात वाईड अँगल आणि काही प्रमाणात झूमही मिळतो. मंदिराचा पूर्ण प्राकारही त्यानं घेता येणं शक्य असतं आणि मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण कळसही. ट्रायपॉडचं वजन टाळण्यासाठी कोणत्याही कंपनीची लेन्स खरेदी करताना त्यात इमेज स्टॅबिलायझर असल्याची खात्री करून घ्या. अशा लेन्सना कॅनन इमेज स्टॅबिलायझर तर निकॉन व्हायब्रेशन रिडक्शन म्हणतात. फोटो काढताना हात ट्रायपॉडप्रमाणे अगदी स्थिर राहू शकत नाही. साधी लेन्स वापरली तर असे फोटो ब्लर्ड किंवा हलल्यासाऱखी प्रतिमा मिळते. त्यासाठी इमेज स्टॅबिलायझर मदतीसाठी धावून येतो. अर्थात शटरस्पीड वाढवूनही स्पष्ट प्रतिमा घेता येते. मात्र, हाय शटरस्पीड वापरताना योग्य सेटिंग ठेवणं गरजेचं असतं.
स्थिर चित्रणासाठी हल्ली बाजारात मिळतो तसा खिशात मावणारा ट्रायपॉडही प्रवासात नेता येईल. वजनालाही तो अत्यंत हलका असतो. खरेदी करताना त्याची वजन पेलण्याची क्षमता तपासून पाहिलं, की झालं. शर्ट किंवा पँटच्या खिशात तो सहज मावतो. प्रवासाला जाताना काही लोक लॅपटॉप घेऊन जातात. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. चार किंवा आठ जीबी क्षमतेचं मेमरी कार्ड भरल्यानंतर, दुसरं नसल्यानं नवीन खरेदी करण्यासाठी शोधाशोध सुरू होते. कार्ड खरेदी करतानाच ते अधिक क्षमतेचं, म्हणजे 16 किंवा अधिक जीबीचं असावं. एकापेक्षा अधिक कार्डं असल्यास उत्तम. कारण दुर्दैवानं एखादं कार्ड डिफेक्टिव्ह निघाल्यास, स्वतःलाच दोष देत बसावं लागेल. हल्लीचे कॅमेरे विशिष्ट बॅटरी किंवा नेहमीच्या पेन्सिल सेलवरही चालणारे असतात. सेल घेताना ते रिचार्जेबल असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. शक्य असल्यास बॅटऱ्यांचे दोन सेट असणं अधिक चांगलं. दोन्ही प्रकारच्या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी चार्जर मात्र विसरता कामा नये.
काही वेळा एखाद्या दृश्याचा फोटो घेतला तरी तो चांगला येईलच अशी स्वतःलाच खात्री वाटत नसते. रॉ फॉरमॅट वापरत असाल, तर बिनदिक्कत असे फोटो काढा. पोस्ट प्रोसेसिंगमध्ये त्यात भरपूर दुरुस्ती करता येऊ शकते. प्रवास करावा, भरपूर करावा आणि भरपूर फोटो काढावेत. शेवटी या साऱ्या आठवणी आपण भविष्यासाठीच साठवून ठेवणार आहोत.
www.sargunlekhani.com LA ha article gheu shakto ka
ReplyDelete