मधू-बाज किंवा मोहोळ घार को णत्याही गोष्टीचा योग यावा लागतो, असं म्हणतात. काही वेळा हे योग अकस्मात, कोणताही हासभास नसताना येतात. सेवानिवृत्तीनंतर हरी हरी म्हणत घरी बसून, मुला-नातवंडांना 'आमच्या काळात असं होतं', 'आम्ही बुवा असं कधीच केलं नव्हतं', असं सांगत त्यांना बोअर करण्याऐवजी आम्ही आमचा छंद जोपासला होता. घरच्यांची आपल्याला आणि आपली घरच्यांना शिंची कटकटच नको, हा आमचा खाक्या! तर सांगायचा मुद्दा असा, की आम्हा पक्षीनिरीक्षक ज्येष्ठ नागरिकांची अनौपचारिक बैठक होते काय आणि अमृतमंथनातून ज्याप्रमाणे स्यमंतक मणी बाहेर पडला तद्वत त्यातून दांडेली बाहेर पडतं काय, सारंच न्यारं! गेल्या फेब्रुवारीतच आम्ही सर्वजण एकत्र रणथंभोरला गेलो होतो. तीन महिने म्हणजे भलताच प्रदीर्घ काळ. दांडेलीचा निर्णय पक्का होताच आम्ही उत्साहानं तयारीला लागलो. ऐनवेळी एक मोती गळाला. खरं तर आम्ही चौघं जाणार होतो. आता इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही येणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही तिघांनीच जायचं ठरवलं. पारंपरिक म्हण थोडीशी बदलून आम्ही "थ्री इज अ कंपनी, फोर इज अ क्राऊड', असं म्हणून तयारीला लागलो. सोमवारी...
Comments
Post a Comment